क्रिडा व मनोरंजन

# भारताचा स्टार फलंदाज – “विराट कोहली याने शनिवारी कसोटी संघाचे कर्णधारपदाचा दिला राजीनामा’..

मुंबई १६ जानेवारी-
मिळालेल्या प्राप्त बातमीनुसार भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने शनिवारी (१५ जानेवारी) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. विराट भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असून गेले ७ वर्षे तो कसोटी संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सांभाळत होता. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने पराभूत झाल्यानंतर त्याचा हा निर्णय सर्वांसमोर आला आहे.
एमएस धोनीने डिसेंबर २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराट कोहलीने जानेवारी २०१५ मध्ये भारताच्या कसोटी संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. अखेर विराटने ७ वर्षांनंतर या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

विराटने कर्णधारपद सोडल्याची पोस्ट करताना म्हटले आहे की, ‘संघाचा योग्य मार्गाने पुढे नेण्यासाठी गेली ७ वर्षे कठोर परिश्रम, चिकाटीने प्रयत्न केले. मी प्रामाणिकपणे काम केले आणि यात कसलीही कसर सोडलेली नाही. पण प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर थांबली पाहिजे. आणि भारताचा कसोटी कर्णधार म्हणून थांबण्याची माझी वेळ आली आहे.’

याशिवाय विराटने बीसीसीआय, संघसहकाऱ्यांसह, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांचे आभार मानले आहेत. तसेच कर्णधारपदासाठी त्याच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल एमएस धोनीचेही त्याने आभार मानले आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे