क्रिडा व मनोरंजन

# धक्कादायक..”ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे निधन “..

सिडनी – ४ फेब्रु.

प्राप्त माहीतीनुसार वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे निधन झाले. याबाबतची माहिती वॉर्नच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी दिली आहे. थायलंडमधील एका व्हिलामध्ये शेन वॉर्न होता, जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता.

त्यानंतर लगेच वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे थायलंडमधील कोह सामुई बेटावर शेन वॉर्न होता आणि तेथे त्याच्या व्हिलामध्ये राहत होता. दरम्यान, हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी दुसरा धक्का आहे. गेल्या आठवड्यात रॉड मार्शच यांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. शेन वॉर्नने क्रिकेटपटू मार्शच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. पण मग या महान गोलंदाजाचे हे शेवटचे ट्विट असेल हे कोणास वाटले नव्हते.

शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये ७०० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. वॉर्न हा जगातील महान स्पिनर मानला जात होता. त्याने जगातील प्रत्येक मैदानावर आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियासाठी सामना जिंकून देणारी कामगिरी केली होती.

२००७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या या महान गोलंदाजाने क्रिकेटला अलविदा केला होता. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १००० बळींचा टप्पा गाठणारा शेन वॉर्न हा जगातील दुसरा गोलंदाज आहे. या यादीत मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. वॉर्नच्या नावावर कसोटीत ७०८ तर वनडेत २९३ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.

आपल्या खेळाने जगाला जितके शेन वॉर्नने प्रभावित केले आहे, तितकेच त्याच्या वादांमुळे क्रिकेट जगतात निराशा झाली आहे. वॉर्नला १९९८ मध्ये बुकीला माहिती दिल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता आणि २००३ च्या विश्वचषकाच्या काही दिवस आधी बंदी घातलेल्या पदार्थांचे सेवन केल्याबद्दल दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.

१९९६ मध्ये भारतात झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध वॉर्नने जोरदार गोलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलिया विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे