क्रिडा व मनोरंजन

?”सांगलीच्या पान विक्रेत्याच्या मुलाने पटावले-2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक..

सांगली-३१जुलैbhimrajnews. com

एक गरीब कुटुंबातील सांगली जिल्ह्यातील पान टपरीवाला मुलाने चालू असलेल्या2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (commonwealth games 2022) भारताने पदक जिंकत आपले खाते उघडले आहे. संकेत महादेव सरगरने 55 किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे.

अशा जिद्दी संकेत सरगरने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकूण 248 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले आहे. त्याने पहिल्या फेरीत स्नॅचमध्ये सर्वोत्तम 113 किलो वजन उचलले होते. यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत म्हणजेच क्लीन अँड जर्कमध्ये 135 किलो वजन उचलून पदक पटकावले आहे .

https://www.facebook.com/sportsauthorityofindiaMYAS/videos/1059342018278542/?flite=scwspnss

मुळचा महाराष्ट्रातील सांगलीचा असलेल्या संकेतचा वेटलिफ्टिंगची प्रचंड आवड होती. संकेत (21) हा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात इतिहासाचा विद्यार्थी आहे. खेलो इंडिया युथ गेम्स 2020 आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2020 मध्येही तो चॅम्पियन ठरला होता. संकेतच्या नावावर 55 किलो गटात राष्ट्रीय विक्रम आहे. त्याने एकूण 244 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम केला होता.

संकेतने गतवर्षी पटियाला येथे झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून नवा विक्रम नोंदवला होता. यासह संकेत महादेव सागरने ताश्कंद येथे झालेल्या 2021 कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 55 किलो गटात सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळविले होते. याद्वारे सरगरने 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्रताही मिळवली होती. सुवर्ण पदक जिंकत अव्वल राहण्यासोबतच संकेत महादेवने 113 किलो वजन उचलून स्नॅचमध्येही राष्ट्रीय विक्रम केला होता. संकेत हा कॉमनवेल्थ 2022 मध्ये सहभागी झालेल्या सर्वात तरुण भारतीय वेटलिफ्टर्सपैकी एक आहे.

जिद्दी संकेतच्या वडिलांचे सांगलीत पानाचे दुकान आहे. त्याला आता आपल्या वडिलांना आरामात पहायचा आहे. संकेत नुकताच म्हणाला, ‘मी सुवर्ण जिंकले तर मी माझ्या वडिलांना मदत करेन. त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मला आता त्यांना आनंद द्यायचा आहे. संकेतचे लक्ष्य पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे आहे.

अशा जिद्दी संकेतला पुढील कार्यासाठी bhimrajnews.com परिवरकडून हार्दिक शुभेच्छा..?

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे