आरोग्य व शिक्षण

?परदेशी पुन्हा येईन ..पुन्हा येईन “राजकीय इतिहासानंतर कोरोनाची  हिंदुस्थानात विमानाने पुन्हा एंट्री”..

मास्क अन इतर निर्बन्ध लवकरचं..

मुंबई:२१डिसें bhimrajnews. com

चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. याशिवाय जपान अमेरिका ब्राझील आणि दक्षिण कोरियामध्येही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत अशी बातमी आहे.त्यातच वाढत्या रुग्णांमुळे भारतासह जगभरात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाच्या Omicron व्हेरिएंटच्या BF.7 या सब व्हेरिएंटने चीनमध्ये हाहाकार माजवला असून, आता भारतातही या सब व्हेरिएंटटे तीन रूग्ण आढळून आले आहेत.

या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगासह भारतातही नागरिकांवर भीतीचं सावट आहे. परदेशी पाहुणे रोगराई आगमन या संकटात आता देशी जनता फटके ते मुस्क वसुली ,विविध निर्बन्ध लागू होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.


कोरोना

जगभरात कोरोनाचा कहर पाहायल मिळत असला, तर सध्या तरी भारतामध्ये मात्र कोरोनाची परिस्थिती सामान्य आहे. पण, अशावेळी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे, असं मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

नुकतीच मिळालेली बातमीनुसार भारतात आतापर्यंत BF.7 चे दोन रूग्ण गुजरातमध्ये तर एक रूग्ण ओडिशात नोंदवला गेला आहे. तर यूएस, यूके आणि बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांसह इतर अनेक देशांमध्ये या व्हेरिएंटचे रूग्ण आधीच आढळून आले आहेत.

सद्या तरी चीनमधील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. आरोग्य मंत्रालयाने चीनमधून येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

जगभरातील काही देशांमध्ये वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता आजपासून भारतात दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आजपासून विमानतळांवर रॅन्डम कोरोना चाचाणी केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.त्यानंतर धोका वाढल्यास देशी जनता यांना सजग राहावे लागणार आहे.

तर सद्या परदेशी रोगी संकटात निवडणूक कार्यक्रम नंतर हा देशी जनता कोरोना निर्बंध कार्यक्रम जोरात चालू होणार अशी जनतेत चर्चा आहे.याविषयी आरोग्यमंत्री शाळा,कॉलेज
,विद्यापीठ ते विविध शासकीय याविषयी तत्पर कर्मचारी यांना दक्षतेचे आदेश मिळाले आहेत.

दरम्यान चीनमधील वाढती कोरोनाची आकडेवारी लक्षात घेता भारत सरकारनेही सावत पावलं उचलण्यास सुरूवात केली असून, केंद्र सरकारकडून सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना पत्र पाठवत बाधितांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेनसिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे