क्रिडा व मनोरंजन

?जगात भारत टेस्ट, वन डे आणि T20 तिन्ही प्रकारात नंबर वन

तसेच भारताने अंडर 19 महिला टी20 विश्वचषक जिंकला: तेही नंबर वन

मुंबई:१६फेब्रु. Bhimrajnews.com

नुकतेच आयसीसीचे ताजे टीम रँकिंग जाहीर झाले आहे. या रँकिंगनुसार टीम इंडिया टेस्ट, वन डे आणि टी 20 या तिन्ही प्रकारांमध्ये नंबर वन झाली आहे. 

भारतीय क्रिकेट संघाने इतिहास घडवला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आपणच राजे आहोत हे सिध्द केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कसोटी, वन डे आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारात भारतीय संघ नंबर वन ठरला आहे ,

भारतीय संघ गेल्या आठवड्यापर्यंत वन डे आणि टी- 20 क्रमवारीत नंबर वन होता पण आॕस्ट्रेलियाविरुध्दची नागपूर कसोटी जिंकल्यावर आपण आता आॕस्ट्रेलियाला मागे सारत कसोटी क्रिकेटमध्येही नंबर वन बनले आहेत.

अशी कामगिरी ह्याच्या आधी एकाच संघाला जमली आहे आणि तो संघ आॕस्ट्रेलियाचा नाही तर दक्षिण आफ्रिकेचा आहे, 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर अशीच आपली धाक जमवली होती. त्यानंतर आता 9 वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) च्या रँकिंगमध्ये हा इतिहास घडला आहे.

भारतीय संघाचे सामने, पॉईंट आणि रेटींग क्रमाने पुढीलप्रमाणे-
कसोटी— 32 — 3690 — 115
वन डे —- 69 — 19445 — 114
टी- 20 — 44 — 5010 — 267
आॕस्ट्रेलियन संघ कसोटी (111 रेटींग) आणि वन डे क्रमवारीत (112 रेटींग) दुसऱ्या स्थानी आहे तर इंग्लंडचा संघ टी-20 क्रमवारीत दुसऱ्या स्थानी (266 रेटींग) आहे.

तसेच भारतीय महिलांनी इतिहास रचला, ब्रिटीशांना पायदळी तुडवून पहिला अंडर 19 टी -20 विश्वचषक जिंकला होता.तेही नुम्बर 1 आहेत.यामुळे सर्वच भारतीय नागरिक यांना अभिमान आहे.याच जगात कौतुक होत आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे