आरोग्य व शिक्षण

सावधान.. ♦️”कोरोनानंतर खोकला, मळमळ, उलट्या, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी.. H3N2 आजाराने देशात पाय पसरले”..

"पहा याविषयी काळजी अन उपाय"..

मुंबई:०७मार्च Bhimrajnews.com

जवळपास दोन वर्षापूर्वी कोरोना नामक आजाराने धुमाकूळ घातला होता आजही त्याचा धोका कायम असतानाच देशातH3N2 आजाराने दोन-तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर त्याचा उद्रेक होत आहे.यामध्ये खोकला, मळमळ, उलट्या, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी आणि काही प्रकरणांमध्ये जुलाब ही लक्षणे दिसत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, देशात वरील लक्षणं असलेल्या रुग्णांच्या संख्येत अचानक प्रचंड वाढ झाल्याचे आयएमएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.यात दिल्लीत फ्लूच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.त्याप्रकरणी एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे की, हा आजारही आता कोरोनासारखाच पसरत आहे.

तर मुंबई मध्येH3N2 मागोमाग मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे.आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात रविवारी कोरोनाचे 46 नवे रुग्ण सापडले. रविवारी सक्रिय रुग्णांचा आकडा होता 258. ज्यामध्ये 74 रुग्ण मुंबईतील होते असं सांगण्यात आलं. थोडक्यात सध्या महाराष्ट्रात खोकला, तापाचे रूग्ण वाढत असताना, कोरोना रूग्णसंख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.

H3N2 प्रकारचा इन्फ्लूएंझा विषयी बोलताना मेदांता हॉस्पिटलमधील इंस्टिट्यूट ऑफ इंटरनल मेडिसिन रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, H3N2 हा इन्फ्लूएंझा व्हायरसचाच एक प्रकार आहे. तो दरवर्षी या काळात दिसून येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हा एक विषाणू असून तो कालांतराने बदलत जातो. त्याला अँटीजेनिक ड्रिफ्ट असंही म्हटले जाते. ते म्हणाले की, यापूर्वी एक महामारी-एच1एन1 विषाणू आढळून आला होता. 

तर आता त्याचा प्रसारित ताण H3N2 आहे, म्हणून हा एक सामान्य इन्फ्लूएंझा हाही तेवढाच ताण असून हा आजार कोरोनासारखाच पसरतो आहे.इन्फ्लूएंझा प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये ताप, घसादुखी, खोकला, अंगदुखी, नाक वाहण्याचे रुग्ण समोर येत आहेत.त्यामुळे दिल्लीतही फ्लूचे रुग्ण वाढत आहेत.

 

H3N2 Influenza च्या लक्षणांमध्ये खोकला, अस्वस्थ वाटणं, मळमळणं किंवा उलट्या होणं, घसा खवखवणं, अंगदुखी, तापाचा समावेश आहे. यापासून सुरक्षित राहण्यासाठी म्हणून काही प्राथमिक गोष्टींची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं आहे. यामध्ये मास्क वापरणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, हात स्वच्छ धुणं याबाबतची काळजी घेतली जाणं अपेक्षित आहे. शिवाय शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी पाण्याचा अंश असणारे पदार्थ, फळं खावीत, भरपूर पाणी प्यावं असा सल्ला आरोग्य यंत्रणा सध्या नागरिकांना देत आहेत. 

याशिवाय सोशल डिस्टन्सही राखला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले. ज्यांना हा त्रास अति आहे त्यांच्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी इन्फ्लूएंझासाठी लस उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्या वयाच्या लोकांना दम्याचा त्रास आहे, फुफ्फुसाचा गंभीर आजार आहे. अशा लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्याचबरोबर वृद्ध, लहान मुले आणि गर्भवती महिलांना संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे