आरोग्य व शिक्षण

राज्यात ताप, सर्दी, खोकला- घसा खवखवणे, उलट्या, जुलाब..♦️ H3N2 रुग्णसंख्येत वाढ,शाळा बंद..

लक्षणे आणि उपाय..

मुंबई:१५मार्चBhimrajnews.com

देशात कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता राज्यात नवं संकट येऊन उभं ठाकलं आहे.कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. राज्यात 24 तासांत कोरोनाचे दुप्पट रुग्ण, त्यात H3N2 चे रुग्ण आणि त्यांचा मृत्यू यामुळे महाराष्ट्रातील या दुहेरी संकटामुळे राज्यात पुन्हा महासाथ येते आहे की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

तर H3N2 इन्फ्लूएंझाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. आज महाराष्ट्रातून एक बातमी आली आहे की H3N2 विषाणूच्या संसर्गामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.तर H3N2 इन्फ्लूएंझाची वाढती प्रकरणे लक्षात घेता, पुडुचेरी सरकारने 16 ते 26 मार्चपर्यंत सर्व शाळा बंद ठेवल्या आहेत.

नवीन H2N2 विषाणूची (H3N2 school closed) लागण झालेल्या व्यक्तीमधील लक्षणे कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या व्यक्तींसारखीच दिसतात

H3N2 ची लक्षणं (H3N2 symptoms)
1. ताप येणे किंवा ताप येणे.
2 .खोकला
3. घसा खवखवणे.
4. वाहणारे किंवा भरलेले नाक.
5 .स्नायू किंवा शरीरात वेदना.
6 .डोकेदुखी
7. थकवा
8. उलट्या आणि जुुलाब (प्रौढांपेक्षा मुलांमध्ये अधिक सामान्य

महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, “कोरोना आणि H3N2 हे दोन्ही श्वसनसंबंधी आजार आहेत, इतकंच त्यांच्यात साम्य आहे. पण तसा त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही.

ते वेगवेगळ्या फॅमिलीतील आहेत” डॉ. भोंडवे यांनी सांगितलं, “कोरोनाच्या केसेस वाढल्या असल्या तरी तसा आता काही धोका नाही. आताचा विषाणू अजिबात धोकादायक नाही. तर कोरोना असो वा H3N2 व H1N1, अॅडनोव्हायरस आहेत, हे सर्व रेस्पिरेटरी व्हायरस आहेत

बाकी व्हायरसची प्रकरणं म्हणजे तापमानाचा परिणाम आहे. म्हणजे सध्या दिवसा आणि रात्रीचं कमाल-किमान तापमान यात खूप तफावत आहे. ज्यामुळे श्वसनसंबंधी व्हायरस वाढत आहेत. तापमान नियंत्रणात आलं की या आजारांचं प्रमाणही कमी होईल” “त्यामुळे कोरोना असो वा H3N2 सारखे रेस्पिरेटरी व्हायरस यांना घाबरण्याची गरज नाही”, असंही डॉ. भोंडवे म्हणाले. H3N2 पासून कसा बचाव करावा? IMA च्या माजी अध्यक्षांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video पण धोका नसला तरी काळजी घेणं गरजेचं आहे.

Bhimrajnews. Comप्राप्त माहितीनुसार 12 मार्चपर्यंत राज्यात 352 रुग्ण आहेत, असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. H3N2 मुळे काही मृत्यू झाले आहेत. त्याचा दाखला देखील त्यांनी दिला आहे.

राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे.

 

नागरिकांनी मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर ठेवावे. खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमालचा वापर करावा. डोळे आणि नाकाला स्पर्श न करणे. पौष्टीक आहार घ्यावा. भरपुर पाणी प्यावे. पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. फळे व हिरव्या पाले भाज्या यांचा आहारात समावेश करावा.

कोवीड व इन्फ्लूएंझा आजार टाळण्यासाठी हस्तांदोलन करणे,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषध घेणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे या बाबी कटाक्षाने टाळाव्यात. ज्या व्यक्तींचे कोवीड लसीकरण झालेले नाही त्यांनी आपले लसीकरण करुन घ्यावे.

रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळुन आल्यास त्यांनी नजिकच्या शासकीय आरोग्य संस्थेत औषधोपचाराकरीता जावे असे आव्हान करण्यात येतंय

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे