गुन्हेगारी

राज्यात देवेंद्र अन देशात नरेंद्र यांचे लाडके- शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक,रामराज्यातील संभाजी भिडेच्या तोंडाला पुन्हा जुलाब-महात्मा गांधींचे वडील मुस्लीम’ होते -संभाजी भिडे…

अमरावती :२८जुलै bhimrajnews. com

जवळपास मोदी सरकार स्थापनेपासून आजपर्यंत
संभाजी भिडे यांच्या बैठक-भाषणे-कटकारस्थाने याला विविध संघटना/उलगुलान संघटना आणि आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र विरोध असताना,

चालू मोदी-शाही सरकारमध्ये यांचे लाडके चेले यांचं नवनवीन करामती चालू असून

काल नवीन घटना घडली असून..
काल अमरावती शहरातील बडनेरा मार्गावर असलेल्या जय भारत मंगलम या ठिकाणी संभाजी भिडेंच्या सभेचं 27 जुलै रोजी रात्री आयोजन केले होते.यामध्ये ‘महात्मा गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास गांधी यांचे वडील नाहीत. त्यांचे खरे वडील हे एक मुस्लीम जमीनदार आहे’, असे तारे संभाजी भिडे यांनी तोडले आहेत,यावरून आता देशात हा वाद पेटला आहे.

तर प्राप्त माहितीनुसार,संभाजी भिडे म्हणाले की, “महात्मा गांधींचे जे वडील म्हटले जातात, ते करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून करमचंद गांधी पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधी यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधींच्या आईला पळवून घरी आणले होते.”असा ही ते म्हणाले आहेत.

 

आणि संभाजी भिडे एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, “महात्मा गांधी यांच्या आईला पळवून आणल्यानंतर जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे खरे वडील नाहीत, ते त्या मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहेत. महात्मा गांधींचे शिक्षण आणि सांभाळ त्याच मुस्लिम जमीनदाराने केला. माझ्याकडे याबद्दल पुरावे देखील आहे”, असं विधान भिडे यांनी केले.

याच कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, “जगात हिंदुस्थान एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंची कीर्ती, शौर्य अफाट आहे. सध्या हिंदू स्वतःचं कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि धर्म विसरला आहे. त्यामुळे हिंदुस्थानची, हिंदूंची अधोगती होत आहे. देशामध्ये सर्वधर्म समभावाचा उपदेश नको. असा उपदेश देणाऱ्या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करावे लागेल”, असं विधान भिडेंनी केलं आहे

यावरून आज शुक्रवारी ( २८ जुलै ) विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे

राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर ते बाहेर कसे फिरू शकतात. यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे? त्यामुळे कलम १५३ अंतर्गत भिडेंना अटक केली पाहिजे,” अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, “पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन सरकारने उचित कार्यवाही करावी.”अशी शिफारस त्यांनी केली आहे. बाकी खरच कारवाई होणार का याबाबत  नेहमी प्रमाणे -पाठबळ मिळणार याची जनतेत चर्चा आहे.

 

 तर बाकी 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन पासून,महिला टिकली ,आंबा -मुले इत्यादी  रोज पर्यंत शोध –भारतीय जनता पार्टीचे लाडके ब्रम्हचारी संभाजी भिडे-चेले  यांचा  अन राजकिय संसार -रेशनकार्ड माहित नसणारे महाभाग फकीर,बुवा,भोगी..यांचं  मन की बात ..प्रवचन-वगनाट्य-तमाशा मंडळ अजून किती दिवस चालणार…याची जनतेत चर्चा सुरू आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे