गुन्हेगारी

अजब” आज मुंबई संभाजी भिडे याच्या निषेधार्थ आझाद मैदानावर आंदोलनाचा धसका”…आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

#भाई विलास निकाळे व विजय देठे यांस मुलुंड पोलीसांनी घेतलं ताब्यात..

मुंबई:०३ऑगस्ट bhimrajnews. com

सद्या देशात बेरोजगारी, महागाई इत्यादी प्रश्नांनी जनतेत उद्रेक चालू असताना, शांततामय देशात  शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक देशात नरेंद्र अन राज्यात देवेंद्र यांचे लाडके संभाजी भिडे यांच्या रोज नवनवीन वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

प्राप्त माहितीनुसार,याचाच एक भाग म्हणून,संभाजी भिडे याच्या निषेधार्थ  आज आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाचा मुंबई पोलीसांनी धसका घेतलाय त्या मुळेच आज मुलुंड पोलीसां कडून आज भाई विलास निकाळे व विजय देठे याना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

बाकी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं असलं तरी, “सरकारने  पोलीस बंदीबस्तात  रोज प्रवचन-भाषण देण्यास सोडलेले जावई ,संभाजी भिडे यांची अजून तपासणी -अभ्यास सुरू आहे हे विशेष आहे..अशी जनतेत चर्चा आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे