ब्रेकिंग

ब्रेकिंग..”आज पहाटे 6.40 मिनिटांनी ,कोल्हापूर- सांगली आणि सातारा जिल्ह्यात भूकंपाचा धक्का”…

सांगली:१६ऑगस्ट bhimrajnews. com
आज नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज (16 ऑगस्ट) सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते.

प्राप्त माहितीनुसार,कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंप धक्के जाणवले असून धरण सुरक्षित आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोल्हापूर सातारासह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरापासून 15 किमी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप सकाळी झाला. सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे