गुन्हेगारी

भक्तजन हो..”दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराज अखेर अटकेत”….

उस्मानाबाद:१७ऑगस्ट bhimrajnews.com


सद्या हिंदुस्थानात प्रचंड वेगाने रेशनकार्ड माहीत नसणारे हिमालयवासी बुवा,फकीर..इत्यादी संसद -राजकारणात येत असताना, चालू राजकीय अंधश्रध्दा आस्था अन भक्तजन बुवाबाजीत दंग आहेत.

यातच एक मोठी बातमी समोर येत असून,कळंब तालुक्यातील मलकापूर येथे  स्वयं घोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज यांचा मठ आहे. आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्ताला बरे करतात अशी महाराजांची राज्यात ख्याती आहे. यात महाराजांचा मोठा भक्तवर्ग असून यामध्ये विविध पक्षांचे बडे नेते ही महाराज यांचे भक्त आहेत.

यातच नुकतेच भक्त महिलेच्या विनयभंग प्रकरणात लोमटे महाराज याला अटक झाल्याने धार्मिक -राजकीय -भक्तजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

बाकी आस्था अन भक्तांचे लाडके लोमटे महाराजांनी किती महिला अन भक्तांची फसवणूक केली हे तपासात उघड होईलचं, असं पोलिसांनी सांगितलं आहे. लोमटे महाराजांवर या पूर्वीही जादूटोणा आणि लोकांना फसवल्याचे गुन्हे दाखल आहेत.

प्राप्त माहितीनुसार,दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजाविरोधात 28 जुलै 2022 रोजी पीडित भक्त महिलेनं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लोमटे महाराजांविरोधात येरमाळा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडित महिला मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर मलकापूर संस्थांनचे सर्वेसर्वा राष्ट्रसंत तसेच भाविकांच्या सर्व समस्येवर उपाय करणारे स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज यांच्या दर्शनासाठी परळी येथील 35 वर्षीय महिला मठातील दक्षिण मंडपात गेली होती.

महाराजांनी महिलेस प्रवचन खोलीमध्ये बोलून घेत महिलेचा विनयभंग केला होता. या घटनेने मंदिर परिसरामध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. यावेळी महाराजांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्याच रात्री एक वाजता सुमारात महिलेच्या तक्रारीवरून महाराजांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अटक ही झाली होती. मात्र त्यांची जामीनवर सुटका झाली होती.

यानंतर  मात्र पीडित भाविक महिला अत्याचार प्रकरणी न्यायालयामध्ये दाद मागितली होती.य न्यायालयाच्या आदेशाने एकनाथ महाराज झाला पीडित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांना अटक करण्यात आदेश दिले होते.

त्यानुसार लोमटे महाराजाला पंढरपूरामधून अटक केली गेली आहे.बाकी अधिक तपास चालू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे