राजकीय

मोदी सरकारची 2024निवडणुक तयारी पूर्ण “पेट्रोल-डिझेल”खाद्य तेल-गॅस..सरकारी कर tax कमी करून महागाईवर नियंत्रण मिळवणार-गहू आयात करणार…

नवी दिल्ली :१८ ऑगस्ट bhimrajnews. com

हिंदुस्थानाचे प्रधान सेवक नरेंद्र मोदी सरकारला पुढील काही महिन्यांतच निवडणुकींना सामोरे जायचे आहे.देशात आजपर्यंत देशी जनतेकडून प्रत्येक वस्तूवर कर वसुली करताना पाकिस्तान ,श्रीलंका इत्यादी देशाप्रमाणे ,प्रचंड महागाई करून सरकार कर वसुली सरकार करत होते.आता येणाऱ्या निवडणूक लक्षात घेऊन मोदी सरकारने नियोजन चालू केले आहे.

  यात जगात भारत एक असा देश आहे, जेथे कांदा,टोमॅटो पासून पेट्रोल-डिझेल, गॅस,खते इत्यादी किंमतींमुळे सरकारंही कोसळू शकतात.याचा धसका मोदी यांनी घेतला आहे यामुळे मतदारांना डोळ्यासमोर ठेवून तात्पुरत्या का होईना, वस्तूंच्या किंमती खाली आणण्यासाठी
पाळलेले अधिकारी या दृष्टीने कामाला लागले आहेत.

 

याचाच एक भाग म्हणून ,पंतप्रधान नरेंद्र मोदी येणाऱ्या काही दिवसांत यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, यात लोकल गॅसोलीन सेल्सवरील टॅक्स कमी करणे, तसेच खाद्य तेल आणि गव्हावरील आयात शुल्क कमी करणे आदींचा समावेश आहे. गॅसोलीनवरील टॅक्स कमी केल्यास, पेट्रोल-डिझेलचे दरही कमी होतील आणि निवडणूकित आपलं दमदार सरकार जाहिरात करण्यास मोदी मोकळे होतील.अशी जनतेत चर्चा आहे

प्राप्त माहितीनुसार,सरकारकडे जनता कर कमी करून,जनतेला दिलासा देण्यासाठी काही महिनेच शिल्लक आहेत. अन्य एक अधिकारी म्हणाले, देशाच्या अनेक भागात पाऊस व पुरामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.


त्यामध्ये खाद्य तेल,टोमॅटो,लसूण कांदा,पेट्रोल-डिझेल,गॅस…इत्यादी वर लावलेला gst कर प्रामुख्याने समावेश आहे. सरकारने महागाई कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. तर साठेबाजांवर कारवाई केल्याने किमती कमी होतील. २०२२ मध्ये गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध लावल्यानंतर सरकारने गेल्या महिन्यात काही प्रकारच्या तांदळाच्या शिपमेंटवरही बंदी घातली आहे. तसेच काही खाद्य पदार्थांच्या साठवणुकीवरही निर्बंध लावले आहेत.

तर देशातील पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी अन्नधान्य महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार रशियाकडून स्वस्त दरात गहू खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. प्रत्यक्षात मर्यादित पुरवठ्यामुळे देशात घाऊक गव्हाच्या किमती दोन महिन्यांत 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे जुलैमध्ये महागाईचा दर 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.महागाईचा गरीबांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी रशियाकडून 90 लाख मेट्रिक टन गहू आयात करण्याची सरकारची योजना आहे.अशीही बातमी मिळत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे