आपला जिल्हा

उदनवाडी एस. टी महामंडळ विनंती बस थांबा मंजूर झाल्यानंतर ; पहिले प्रवासी शाहरुख मुलाणी

# आबासाहेबांने स्वप्न मावळ्याने पूर्ण केले.

सांगोला. (प्रतिनिधी) – मौजे. उदनवाडी एस. टी. महामंडळ विनंती बस थांबा मंजूर झाल्यानंतर पहिले प्रवासीचे मानकरी विधानभवन माकप कार्यालय प्रमुख शाहरुख मुलाणी झाले आहे.

उदनवाडी येथील प्रा. मुकुंद वलेकर व विधानभवन माकप कार्यालय प्रमुख शाहरुख मुलाणी यांनी उदनवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या विनंतीनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातील साध्या, ग्रामीण व जलद (जवळ, मध्यम व लांबचा पल्ला) गाड्यांना उदनवाडी येथे अधिकृत विनंती थांबा मंजूर करून संबंधितांना योग्य ते आदेश देऊन सहकार्य करावे अशी जोरदार मागणी मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे व एस. टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भाप्रसे शेखर चन्ने यांच्याकडे ईमेल द्वारे दि. 06 जुलै, 2023 रोजी निवेदन पाठवून केले होती. व उदनवाडी ग्रामपंचायतीचा दि. 07/07/2023 रोजीचा ठरावाचे पत्र संबंधित कार्यालयात देण्यात आले होते.

त्यानंतर सांगोला आगार व्यवस्थापक निसार नदाफ यांनी जा. क्र. राप/आव्य क/सां/वाह/421 रा.प सांगोला आगार दि. 13/07/2023 रोजी या पत्राद्वारे जलद गाड्यांना विनंती थांबा करण्याचे राज्यातील काही विभाग नियंत्रक यांना कळविले होते. तसेच, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सोलापूर विभाग सोलापूर विभाग नियंत्रक रा. प. सोलापूर जा. क्र. रा. प./ विनोसो / वाह / चालन / 23 / 13372 दि. 14/07/2023 रोजी मौजे उदनवाडी येथे रा.प. बसेस थांबविण्याबाबत मंजुरी दिली होती. त्यानुसार मुलाणी यांनी एस. टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भाप्रसे शेखर चन्ने, सोलापूर विभाग नियंत्रक आणि सांगोला आगार व्यवस्थापक यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून तिकीट यंत्रामध्ये मौजे उदनवाडी गावाची नोंद झाल्यानंतर दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 02.15 वाजताच्या पंढरपूर कोल्हापूर या गाडीने सांगोला ते उदनवाडी प्रवास करण्याचे मानकरी शाहरुख मुलाणी हे पहिले प्रवासी झाले तर दुसरे प्रवासी हे अरविंद वलेकर नाजरामठ ते उदनवाडी हे राहिले.

एस टी महामंडळाची बस उदनवाडी गावाच्या विनंती बस थांबा येथे थांबल्यानंतर वाहक आणि चालक यांना श्रीफळ देऊन सरपंच यांचे पती अशोक वलेकर यांनी आभार व्यक्त केले तर अमोल वलेकर म्हणाले की, माजी मंत्री तथा 11 वेळा आमदार डॉ. भाई गणपतराव देशमुख यांचे राहिलेले स्वप्न त्यांचे मावळे मुलाणी यांनी पूर्ण केले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तसेच उदनवाडी गावाला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 75 वर्षात पहिल्यांदा विनंती बस थांबा मंजूर झाल्याबद्दल गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. त्याचबरोबर उक्त कार्य करत असताना ज्यांनी कोणी कळत नकळत सहकार्य केले त्या सर्वांचे मुलाणी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे