कृषीवार्ता

मोदी सरकारचा दणका-” शेतकरी कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय..शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण

निर्यात शुल्कामध्ये वाढ होताच कांद्याचे दर हजार रुपयांनी पडले; शेतकरी संतप्त, आंदोलनांचा वाढणार जोर

 

मुंबई:२२ऑगस्ट bhimrajnews. com

देशातील मोदी-शाही कार्यतत्पर सरकारने शेतकरी विरोधी कायम कायदे कानून करताना,इंधन,वीज,गॅस,उदयोग जगतातील महागाई याकडे कायम दुर्लक्ष करताना,शेतकरी टोमॅटो, पासून वाढता कांदा दर याला ब्रेक लावताना नुकताच कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे.

रामराज्यात सर्व वस्तूवर tax

https://fb.watch/mzWqQnJqjE/?mibextid=2Rb1fB

केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध म्हणून नाशिकमधील सर्व बाजार समित्यांमधील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले आहेत तर, शेतकऱ्यांच्या हितासाठीच हा निर्णय घेतल्याचा अजब दावा ,केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला आहे.

भारती पवार म्हणाल्या, बाजारात कांद्याची मागणी वाढली आहे. भविष्यात कांद्याची स्थिती टोमॅटोसारखी होऊ शकते. त्यामुळे ग्राहक आणि शेतकरी या दोघांचा विचार करून कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने शुल्क लावले आहे. देशात कांद्याला मागणी वाढत आहे. त्यामुळे केंद्राच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा कोणताही तोटा होणार नाही.

तर गहू परदेशातून आयात करणे ते विविध शेतीमाल यावर नियंत्रण ठेवत असताना,इतर वस्तू महागाई -वसूल कर नियंत्रण यावर सरकार उदासीन आहे अशी ही चर्चा जनतेत आहे.

दरम्यान शनिवारी (१९) अचानक निर्णय घेतल्याने जेएनपीए बंदरात आणि बंदरा बाहेरील विविध कंटेनर यार्ड मध्ये सुमारे २०० कंटेनर कस्टम विभागाने होल्ड केले आहेत.परिणामी कांदा नाशिवंत माल असल्याने मलेशिया, श्रीलंका, दुबई आदी देशात पाठविण्यात येणारा सुमारे चार हजार टन कांदा सडण्याच्या तयारीत आहे.

तर याचाच परिणाम म्हणून व्यापारी, शेतकरी,निर्यातदार कंपन्यांचे सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती निर्यातदार आणि बच्चूभाई ॲण्ड कंपनीचे मालक इरफान मेनन यांनी दिली.केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मात्र शेकडो निर्यातदार आर्थिक संकटात सापडले असल्याचेही इरफान मेनन यांनी सांगितले आहे.

सोमवारी एपीएमसी बाजारात
१) कांद्याच्या १३१ गाड्या दाखल
२) दोन ते तीन रुपयांनी घसरण
३) प्रतिकिलो १७ ते २२ रुपये दराने विक्री झाली आहे.

कांदा निर्यात शुल्क लादल्याच्या निषेधार्थ व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नाशिक बाजार समितीत सोमवारी (ता. २१) कांद्याचा लिलाव बंद ठेवण्यात आला होता. याचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिणाम झाला नसला, तरी सोमवारी ३ वाजता कांदा-बटाटा बाजारात व्यापारी संघाची बैठक झाली.
तर केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.

तर या पार्श्र्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनेदेखील गुरुवारी (ता. २४) कांदा-बटाटा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती व्यापारी अशोक वाळुंज यांनी दिली आहे.

दरम्यान, केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ केल्याने यावरून विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच कांदा निर्यात शुल्कावर भाष्य करताना वड्डेटीवर म्हणाले, ‘गेल्या वर्षी जाहीर केलेले 350 रूपये कांदा अनुदान अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही.लहरी पद्धतीने सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे कांद्याचे दर १० ते १२ रुपयांवर आले आहेत.

बांग्लादेशाच्या सीमेवर शुल्क वाढल्यामुळं हजारो टन कांदा पडला आहे. बाजार समित्या ओसाड आणि बंद पडल्या आहेत. कांदा उत्पादकांसंदर्भात सरकार गंभीर नाही, अशी टीका वड्डेटीवार यांनी केली आहे.

तर वड्डेटीवार म्हणाले,’ शेतकरी यांचा कांदा महाग झाला खाऊ नका म्हणतील तेल महाग झालं तर तेल घेऊ नका. साखर महाग झाली तर साखर खाऊ नका म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी पोटभर खावं आणि जो गरीब आहे, मध्यम वर्गीय आहे यांनी मात्र महाग झालं खाणे बंद करावं आणि उपाशी मरावं. अशी जर सरकारची भूमिका असेल तर जनतेने यांना धडा शिकवण्याची गरज आहे’. या संदर्भात कॉंग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, अशा इशाराही त्यांनी दिला.

तर काही ठिकाणी सरकारच्या आदेशाची होळी करण्यात आली, तर कुठे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. दरम्यान, अनेक शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय नाशिक जिल्हा कांदा असोसिएशनने रविवारी घेतला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे