ब्रेकिंग

जगात चंद्रावर भारताचा चंद्रयान-३ यशस्वी डंका- पण सावध राहा,” चंद्रावर घर देतो म्हणून भाजपवाले मते मागतील : उद्धव ठाकरे यांचा दणका

नाव देणे-बदलणे,राजकीय श्रेय चंद्रयान मोहिमेमुळे "देशात महागाई-बेरोजगारी-खाजगीकरण-देशी समस्या कमी होणार नाहीत..

मुंबई:२७ऑगस्ट bhimrajnews. कॉम

आज दि. २७ ऑगस्‍ट हिंगोलीच्या राममैदानावरील सभा संपन्न झाली यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेलक्या शब्दात भाजप आणि भक्तजन यांची कानउघडणी केली आहे.

 

नुकताच चांद्रयान-३ यशस्वी झाली, याचा मला आणि देशभरात आनंद आहे. मला इस्रो आणि शास्त्रज्ञ यांचा अभिमान आहे.येत्या काळात निवडणुका आहेत.याचा सत्ताधाऱ्यांकडून या चांद्रयान मोहिमेचा भक्तजन श्रद्धा आणि राजकीय निवडणुकीसाठी वापर केला जाऊ शकतो,अन तसा प्रचार चालू आहे असं सांगितलं.

सावध रहा चंद्रावर घरं देण्याचं अश्वासनही दिले जाऊ शकते, असा अप्रत्‍यक्ष टाेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि. २७ ऑगस्‍ट ) भाजपला लगावला आहे.त्यामुळे सत्ताधारी गटाकडून अश्वासनांचा पाऊस पडेल यामुळे जनतेने सावध रहा असही सांगितलं आहे.

तर माझा बाप चोरलात, घराणेशाहीवर बोलण्यास तुम्हाला अधिकार नाही. आपल्या दाढीवाल्याने भाजपची पावडर लावली आहे, अशी टीका नाव न घेता उद्धव ठाकरेंनी केली. नाग समजून पूजा केला तो डसला आहे. सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. . माझ्या आई-वडिलांचा मला अभिमान वाटतो आहे. धनुष्यबाण चोरला तरी जनता माझ्या पाठीशी रामासारखी उभी असेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

राज्यात दुष्काळ पडला असताना देखील उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपान दाैर्‍यावर गेले हाेते. जपान सोडा गुजरात गेलेले उद्योग परत आणा. टरबुजाच्या झाडालाही पाणी लागतं, असाही टाेला त्‍यांनी लगावला.

यावेळी त्यांनी गेल्या वर्षी पंतप्रधानांनी एका महिलेकडून राखी बांधून घेतली. चांगली गोष्ट आहे, तुम्हाला जर राखी बांधायचीच असेल बिल्कीस बानोकडून बांधा. मणिपूरमधील धिंड काढलेल्या महिलांकडून राखी बांधून घ्या. महिलांचं रक्षण करा, असेही ते म्‍हणाले आहेत.

बाकी दुसऱ्याच पक्ष पळवा पळवीत भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची दया येते. डबल इंजिन सरकारमध्ये आता अजित पवार यांचा देखील डबा लागला आहे. सरकारमध्ये अजून किती डबे लागणार, असा सवाल करत हसन मुश्रीफ सत्तेत गेले, ईडी त्यांचा पत्ता विसरली आहे असं दिसतय. एनडीएला काही आकार उकार राहिला आहे का, अशीही विचारणा त्‍यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे