ब्रेकिंग

“कुणी ९६ कुळी अन कुणी ९२ कुळी तर कुणबी कुळी मराठा..मराठा आरक्षणात पाटलांसमोर नवा पेच”..

राज्यात अनेक उपोषण-आंदोलन चालू पण मराठा आरक्षणावर राज्याच विशेष लक्ष शिष्टमंडळ रवाना..

 

मुंबई:०९सप्टेंबर bhimrajnews.com


हिंदुस्थानात हजारो जाती व्यवस्था-परंपरा आहेत आणि हजारो वर्षापासून शिक्षण पासून देव,दानव,मानव,मठपती,पुजारी,फकीर,
कुलकर्णी,राजे, वंश परंपरा यांचं नियमित आरक्षण होत अन चालू आहे.

यातच देश स्वतंत्र झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित जाती-जमाती आरक्षण निश्चित केल्यानंतर सर्व जाती जमातीच् खरच
नोकऱ्या-शिक्षण,यांना मिळालं का हा संशोधनाचा
विषय आहे.

यातच मराठा -धनगर आरक्षण यांचं राज्यात अनेक वर्षांपासून धनगर की धनगडं तसेच मराठा की कुणबी मराठा पोटजाती यामुळं नवा पेच चालू आहे.

याचाच एक भाग म्हणून ल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील मागील अकरा -बारा.. दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सरोटी गावात उपोषण करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार,मनोज जरांगे यांच्या नव्या कुणबी आरक्षण मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मराठा समाजात अनेक उपजाती आहेत. कुणी ९६ कुळी तर कुणी ९२ कुळी असल्याचा दावा करतो. त्यामुळे संबंधित लोकांना कुणबी बनवलेलं चालणार आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

आमचं म्हणणं असं आहे की, ज्यांना ९६ कुळी राहायचं आहे किंवा त्याला कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही. अशा लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊ नये. त्यांना जबरदस्ती केली जाणार नाही. त्यांनी बिंनदास्त मोकळं राहावं. त्यांनी मोठा पाटील किंवा बारीक पाटील, जसं राहायचं तसं राहावं. पण गोरगरीब पोरांचं कल्याण होऊ द्या, त्यांनी कुणबी जात प्रमाणपत्राला विरोध करू नये”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे .

तर मीडियाला दिलेल्या बातमीनुसार,कारण तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नसेल तर घेऊ नका. तुम्हाला जोरजबरदस्ती केली जाणार नाही. तुम्हाला जेव्हा ३०-४० वर्षांनी वाटेल, की आता कुणबी प्रमाणपत्र घ्यायला हवं, तेव्हा त्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढावं. तोपर्यंत मोठा पाटील म्हणून राहा. वाड्यावर राहा. बंगल्यावर राहा. रानात जाऊन राहा नाहीतर तिकडे डांबरीवर जाऊन झोप.”, अशी रोखठोक भूमिका जरांगे पाटलांनी मांडली आहे.

तर राजकीय पाटलांच्या खेळीत ,ओबीसी कोट्यातून आरक्षण घेण्याचं की कुणबी मधून आरक्षण घेणार याबद्दल मराठा आरक्षण याबाबत नवा पेच निर्माण झाला आहे.

बाकी राज्यसरकार
ते आंदोलक यांच्यात रोज नव्या घडामोडी चालू असून रोज नवनवीन माहिती हाती येत आहे.याला न्यायालयात कस सादर केलं जातं हेही पाहणं आवश्यक आहे अशी जनतेत चर्चा आहे.

तर राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा यांना पुराव्यांच्या तपासणीअंती कुणबी प्रमाणपत्र देण्याचे मान्य करत त्यासाठी नीवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे