देश-विदेश
Trending

काय सांगता. ! “वॉशिंग मशिन, फ्रिज, लॅपटॉप तसेच मोबाइल..आदी वस्तूंला ५-१० वर्षाची ग्यारंटी -नंतर वस्तू भंगारात जाणार..

नवी दिल्ली-१०सप्टें.bhimrajnews.com

सद्या देशात नवनवीन प्रयोग सामान्य जनतेवर केले जात आहेत.याचाच एक भाग म्हणून कार तसेच अन्य चारचाकी वाहने १५ वर्षांनंतर भंगारात जमा करावी लागतात अस म्हणतात.

असच काही य नागरिकांच्या रोजच्या वापरात असलेली वॉशिंग मशिन, फ्रिज, लॅपटॉप तसेच मोबाइल,इत्यादीदी वस्तूंसाठी केंद्र सरकारकडून आता एक्स्पायरी निश्चित केली गेली आहे.

प्राप्त माहितीनुसार,कॉम्प्युटर, मॉनिटर, माउस, की-बोर्ड, लॅपटॉप, कंडेन्सर, मायक्रो चिप, टेलेव्हिजन, वॉशिंग मशिन, आदी इ-वेस्टची विल्हेवाट लावणे वा प्रक्रिया करण्याचा पहिला प्रकल्प मध्य प्रदेशात भोपाळ येथे उभारला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड व भोपाळ स्थानिक प्रशासन यांच्याकडून हा प्रकल्प चालवला जात आहे.

यामध्ये सरकारने देशातील इ-वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी १ एप्रिल २०२३ रोजी कायदा संमत केला. यानुसार जो ई-वेस्टची निर्मिती करील, त्यालाच त्याची विल्हेवाट लावावी लागणार आहे. कंपनीने तयार केलेल्या वॉशिंग मशिनसाठी १० वर्षांची मुदत असेल. वॉशिंग मशिनच्या आणखी उत्पादनांची किंवा नवीन ब्रँड लॉँच करण्याची परवानगी मागताना कंपनीला १० वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या ६० टक्के वॉशिंग मशिन नष्ट केल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंड आणि तुरुंगवास या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

काय किती वर्षांनी जाणार भंगारात?
फ्रिज १० वर्षे
सीलिंग फॅन १० वर्षे
वॉशिंग मशीन १० वर्षे
रेडिओ सेट ८ वर्षे
स्मार्टफोन/लॅपटॉप ५ वर्षे
टॅबलेट/आयपॅड ५ वर्षे
स्कॅनर ५ वर्षे..इत्यादी

यात मुदत संपलेल्या वस्तूंची विल्हेवाट करण्याची जबाबदारी संबंधित उत्पादकांवर निश्चित केली आहे. योग्य प्रकारे यांची विल्हेवाट लावल्यानंतरच कंपन्यांना जुनी वस्तू बदलणे किंवा नवीन ब्रँड लाँच करता येणार आहे. आता कंपन्या अशा वस्तूंची निर्मिती करणार की, ज्यांचे एकूण आयुष्य फार मोठे नसेल. फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशिन, आदींमध्ये अशा दर्जाचे सामान वापरले जाईल, जे मुदत संपल्यानंतर वापरण्याजोगेच उरणार नाही. यामुळे ग्राहकांना आपली सवय बदलून,नाइलाजाने या वस्तू भंगारात काढाव्याच लागतील.

बाकी 15 वर्षानंतर  चार चाकी गाड्या भांगरात नुसार, खरंच याची अमलबजावणी केव्हा अन कधीपासून होणार हे अद्याप  समजले नाही….

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे