गुन्हेगारी

ब्रेकिंग न्युज” सन २०१६ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याची येरवडा कारागृहात आत्महत्या”..

पुणे:१०सप्टे.bhimrajnews. com


राज्यात 13 जुलै 2016 रोजी अहमदनगर येथील कोपर्डीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून राक्षसी वृत्तीने तिचा खून केला करणारा पुण्यातील येरवडा कारागृहातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने गळफास घेऊन आज आत्महत्या केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

सन 2016 रोजी वरील कोपर्डी घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र्र हादरून गेला होता. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. अनेक ठिकाणी निदर्शन करण्यात आली होती.ही घटना कोणाही सामान्य माणसाला संताप आणणारी होती.

कोपर्डीत नववीत शिकणाऱ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा त्याच गावातील तीन नराधमांनी बाईकवरुन पाठलाग केला. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिची अमानुष हत्या केली.यापैकी कोपर्डी बलात्कारातील आरोपी नराधम जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही नगरच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणी जितेंद्र शिंदे हा मुख्य दोषी होता. तो पुण्यातील येरवडा कारागृहात तो आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होता.आज पहाटेच्या सुमारास त्याने गळफास लावला. पोलिस पहाटे गस्तीवर गेले असताना पोलिसांना जितेंद्र शिंदेचा मृतदेह आढळून आला आहे.

घटनेची माहिती मिळताच अधिकारी पोहचले आहे. सदर आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचं शवविच्छेदन करण्यात येत आहे.याबाबत अधिक तपास चालू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे