देश-विदेश

पुन्हा नवीन शोध..! केंद्र सरकारचा आता देशात आधारकार्ड नाही तर” जन्माचा दाखला ०१ ऑक्टोबर पासून सक्तीचा…

बाकी जुना आधार ,नविन आधार इत्यादींबाबत करायचं काय.?याची घोषणा लवकरच मोदी सरकार करणार

मुंबई:१५ सप्टें.bhimrajnews.com

देशात रोज नवे मोदी सरकार कल्पना समोर आणून अंमलबजावणी करतं असताना  जनता त्रस्त आहे. यातच आता इथून पुढे आधार कार्डऐवजी जन्माचा दाखला सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, एक ऑक्टोंबरपासून जन्म दाखला संबंधी नियम लागू झाल्यानंतर, सरकारी कामकाजात आधारकार्ड ऐवजी जन्म दाखला महत्त्वाचा ठरेल. कोणत्याही प्रकारची नोंदणी करायची असो, शाळेत दाखला घेणे, परवाना काढणे, बँकेत खाते उघडणे अशा सर्व किरकोळ कामांपासून ते महत्त्वाच्या कामांसाठी जन्म दाखल्याचा वापर अनिवार्य असणार आहे.

आपल्याला  सद्या कोणतेही सरकारी कामकाज करायचे असले तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा लागतो तो म्हणजे आधार कार्ड. शाळेत दाखला घ्यायचा असून बँकेत खाते खोलायचे असो किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असो त्यासाठी महत्त्वाचे असते ते म्हणजे आधार कार्ड. वरील नियमामुळे यामुळे हे आता कालबाह्य होणार आहे.

केंद्र सरकारने आता ओळखपत्राबाबत काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. हे महत्त्वाचे नियम देशात एक ऑक्टोंबरपासून अमलात आणले जातील. केंद्र सरकारने आणलेले नियम लागू झाल्यानंतर जन्म दाखल्याचे महत्व वाढणार आहेत.

यात मान्सून सत्रात केंद्र सरकारने जन्म दाखला संबंधित बिल मंजूर केले होते. बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याची अधिसूचना काढली आहे. हा नियम लागू झाल्यानंतर आपल्याला जन्म दाखला ऐवजी इतर कोणत्याही कागदपत्राची गरज पडणार नाही

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे