महाराष्ट्र

अखेर राजपत्रीत आदेशानुसार,”औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे बदलली..पहा सोबत आदेश

मुंबई:१६ सप्टें.bhimrajnews. com

अखेरीस खूप दिवसापासून राज्यात गाजत असलेला औरंगाबाद जिल्ह्याचे नाव हे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव आता धाराशिव करण्याविषयी दि.१५ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने आपला राजपत्रित आदेश जारी केला आहे.

पाठीमागे मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नाही असे सांगितले होते. पडताळणी झाली नसताना तुम्ही नावे कशी बदलली अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली होती. त्यामुळे तूर्तास औरंगाबादचे नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव उस्मानाबाद जिल्हा असेच ठेवायचे ठरवले होते. ही प्रक्रिया पूर्ण करुन आम्ही विचार करु असे सरकारने सांगितले होते.

यानुसार आता उद्याच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमी हा बदल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

यात तब्बल सात वर्षांनी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे अशीही माहिती मिळत आहे.तर यापूर्वी औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यात आले होते.

पंरतु औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव तसंच उस्मानाबाद जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गावाचे नाव बदललेले नव्हते.

त्यामुळे शहरानंतर इतर नावे शुक्रवारी राज्य सरकारने राजपत्र जारी करुन बदलली आहेत.

आधी आता औरंगाबाद विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग,औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा,औरंगाबाद उप-विभाग छत्रपती संभाजीनगर उप-विभाग-
औरंगाबाद तालुका छत्रपती संभाजीनगर तालुका
औरंगाबाद गाव छत्रपती संभाजीनगर गाव
आधी आता
उस्मानाबाद जिल्हा धाराशिव जिल्हा
उस्मानाबाद उप-विभाग धाराशिव उप-विभाग
उस्मानाबाद तालुका धाराशिव तालुका
उस्मानाबाद गाव धाराशिव गाव अस करण्याविषयी राजपत्र आदेश झाले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे