देश-विदेश

देशी I.N.D.I.A.इंडिया पक्षाचा “दररोज मोडी भक्तीत तल्लीन,भारतीय 14 न्युज अँकरवर बहिष्कार”…

हिंदुस्थानात इंग्रजी-परदेशी शब्द -इंडियात आहे , तर देशी भारतीय नावावरून गदारोळ..


नवी दिल्ली:१६ सप्टें.bhimrajnews.com

नुकतीच I.N..D.I.A आघाडीच्या समन्वय समितीची बैठक काँग्रेसचे संघटन सचिव केसी विनोगोपाल यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांचे निवासस्थान 6, जनपथ येथे झाली. त्या बैठकीत I.N.D.I.A आघाडीतल्या घटक पक्षांच्या प्रवक्त्यांनी देशातल्या 14 न्युज अँकर्सच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे ,यामुळे हिंदुस्थानात खळबळ उडाली आहे.

https://fb.watch/n5b4GWYB0L/?mibextid=VhDh1V

झालेल्या बैठकीत 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर देशात अविष्कार स्वातंत्र्याचा, माध्यम स्वातंत्र्याचा गळा घोटला गेल्याचा आरोप होत असताना..

दररोज देशात महागाई-बेरोजगारी,शेतकरी इत्यादी प्रश्न असताना दररोज संध्याकाळी राजकीय चर्चा नावाने राजकीय बाजार भरवला जातो यात..

यात ,काँग्रेसने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले की – “दररोज संध्याकाळी 5 वाजता  नंतर काही टीव्ही चॅनेल्सवर द्वेषाचा बाजार भरवला जातो. अशा स्थितीत, भारत आघाडीने ठरवले आहे की ‘आम्ही द्वेषाच्या बाजारात ग्राहक म्हणून जाणार नाही’. ‘भारत द्वेषमुक्त भारत’ हे आमचे उद्दिष्ट आहे, भारत एक होईल, भारतच जिंकेल.”

यानुसार विरोधी पक्ष आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स’ (इंडिया) ने 14 टीव्ही अँकरवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी न्यूज अँकरची यादीही जाहीर केली आहे. अदिती त्यागी, अमन चोप्रा, अमिश देवगण, आनंद नरसिम्हा, अर्णब गोस्वामी, अशोक श्रीवास्तव, चित्रा त्रिपाठी, गौरव सावंत, नाविका कुमार, प्राची पाराशर, रुबिका लियाकत, शिव आरूर, सुधीर चौधरी आणि सुशांत सिन्हा इत्यादी अशी या अँकरची नावे आहेत. सर्वजण विविध टीव्ही चॅनेलमधील शोचे होस्ट आहेत.

तर देशात I.N.D.I.A आघाडी नावांमुळे मोदी सरकारची कोंडी झाली आहे अन..

पूर्वीपासून इंग्रजी -परदेशी नाव इंडिया असताना आता भारत हेच देशी नाव देशाचं आहे याबाबत देशात गदारोळ चालू आहे.याबाबत जनतेत देशी समस्या सोडून या विचित्र गोष्टीबद्दल चर्चा चालू आहे.

तर विरोधी  -I.N.D.I.A  ,तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह 28 विरोधी पक्षांचे नेते यात सहभागी झाले होते. बैठकीत समन्वय व प्रचारासह पाच समित्या स्थापन करण्यात आल्या  आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे