आपला जिल्हा

मराठा आरक्षण प्रश्नी आज पुन्हा एकदा सांगलीत “मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन”…जिल्हाभरातुन आंदोलक येणार

सांगली:१७ सप्टें.bhimrajnews. com

आज रविवारी सांगलीत मराठा क्रांती मोर्चा होणार असल्याने तयारीला वेग आला आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्हाभरातून येणाऱ्यांसाठी सुलभ पार्किंगची सोय करण्यात आली आहे. यासाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा मार्गावर पाहणी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार,विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकापासून सकाळी दहा वाजता मोर्चाला जिजाऊ वंदना करून सुरूवात होईल. या वेळी क्रांतीसिंहाच्या पुतळ्याला स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्याहस्ते पुष्पहार अपर्ण करण्यात येईल. यानंतर मोर्चा गेस्ट हाऊस, मार्केट यार्ड, कर्मवीर चौक मार्गे राममंदिर चौकात पोहोचणार आहे. या ठिकाणी केवळ चार तरुणांची मनोगते व्यक्त होतील.

अशी माहिती शुक्रवारी पदाधिकाऱ्यांनी नियोजनाबाबत पत्रकारांशी संवाद साधला आहे. या वेळी पद्माकर जगदाळे, महेश खराडे, डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, नितीन चव्हाण, मयूर पाटील, प्रशांत पवार, जयंत जाधव यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते यांच्याकडून मिळत आहे.

यावेळी जिल्हाभरातुन येणाऱ्यासाठी खालील ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

१-इस्लामपूर, शिराळा, वाळवा, आष्टाकडून येणाऱ्यांसाठी जुना बुधगाव रस्त्यावरील इदगाह मैदान, छत्रपती शिवाजी क्रीडांगण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण याठिकाणी सोय असेल.

२- तासगाव, पलूस, आटपाडी, विटा येथून येणाऱ्यांसाठी तात्यासाहेब मळा, लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्क, मार्केट यार्ड परिसरात सोय असेल.

३- जत, कवठेमहांकाळ, मिरजकडून येणाऱ्या आंदोलकांसाठी आयटी पार्क, कांतीलाल शहा प्रशाला, चिंतामणी कॉलेज मैदान, वालचंद महाविद्यालय, भोकरे कॉलेज या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

४- जयसिंगपूर, कोल्हापूरकडून येणाऱ्यांसाठी राजमती शाळा मैदान, कल्पद्रूम मैदान, शंभर फुटी रस्ता परिसरात पार्किंग असेल.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे