महाराष्ट्र

मुंबई ” लालबाग गणपतीच्या पायावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा..यामुळे राज्यात शिवप्रेमीकडून संताप-गुन्हे दाखल करण्याची मागणी

लालबागच्या मंडळाचं चुकलं, ही चुक पुन्हा करु नये..संभाजीराजे

मुंबई:१८सप्टें.bhimrajnews.com


हिंदुस्थानात लवकरच येत्या दोन-चार महिन्यात गणपती अन विविध सणाचं आगमन होत आहे. यात याचा वापर राजकीय ते धर्मवीर-भक्तजन याचा कडुन जाहिरात ते नवीन काही घडवण्याच्या नादात एक नवीन प्रकार समोर आला आहे.

नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचा प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या सोशल मीडियावर लालबागच्या राजाचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर आता एक नवा मोठा वाद पेटला आहे. लालबागच्या राजाच्या चरणांपाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा साकारण्यात आली आहे.

यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे, ही बाब आता मराठा ते शिवप्रेमींना खटकली आहे, त्यामुळे त्यांनी आता मुंबई पोलीस आयुक्तांकडे लालबागचा राजा गणपती मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान वादावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.लालबागचा राजा मंडळाने जे केले आहे, ते आज सकाळीच माझ्यावर कानावर आलं आहे. इतक्या मोठ्या गणपती मंडळाने असे बारकावे नेहमी पाहणे गरजेचे आहे, असे संभाजीराजे म्हणाले आहेत.

तर शिवमुद्रा गणपतीच्या पायावर छापण्याचा मंडळाचा हेतू नेमका काय आहे? यामुळे अनेक शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. या मंडळाने शिव अनुयायांचा अपमान केला आहे. गणपती बाप्पा जरी देव असले तरी शिवाजी महाराजांमुळे ते देव्हाऱ्यात आहेत. त्यामुळे ही राजमुद्रा त्यांच्या पायावर असणे पटत नाही म्हणून या मंडळावर गुन्हा दाखल करण्यात यावा.” अशी मागणीही मंडळाने केली आहे.

दरम्यान आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेत असताना साहजिकच शिवमुद्रेचही पायावर दर्शन घेणार आहोत त्यामुळे हा शिवमुद्रेचा अपमान होत नाहीत अशाही भावना काही.. धार्मिक गणेश भक्तांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे