देश-विदेश

अखेर नव्या संसद भवनात ,कालपासून कामकाजाला सुरुवात”नव्या संविधानात धर्मनिरपेक्ष अन समाजवादी शब्द गायब”..

नवी दिल्ली :२०सप्टें. Bhimrajnews. com

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी आरोप केला की, नव्या संसदेतील कामकाजाच्या पहिल्या दिवशी संविधानाच्या नव्या प्रतींचं वाटप करण्यात आलं. पण या संविधानाच्या सरनाम्यात सेक्युलर (धर्मनिरपेक्ष), सोशलिस्ट (समाजवादी) हे शब्द नाहीत. जर हे दोन शब्द संविधानात नसतील तर ही गंभीर बाब आहे. यामुळे देशात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार,पुढे त्यांनी आरोप केला की, सरकारनं हा बदल खूपच हुशारीनं केला आहे, म्हणूनच त्यांचा हेतू हा अडचणी निर्माण करणारा आहे. मला हा मुद्दा संसदेत उपस्थित करायचा होता, पण मला याची संधी दिली गेली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान काँग्रेसच्या या आरोपांनंतर मोठ्या चलाखीने नविन सुधारणा संविधान न देता-

केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, याबाबत आमच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काल ज्या संविधानाच्या प्रती वाटण्यात आल्या, त्या जेव्हा संविधान तयार झालं त्याच्या कॉपी आहेत.

तर अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं की, आपल्याला माहिती आहे की, १९७६ मध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली, त्यानंतर संविधानाच्या सरनाम्यात सेक्युलर आणि सोशलिस्ट या शब्दांचा समावेश करण्यात आला.

पण जर आम्हाला आज संविधानाच्या प्रती देण्यात येत असतील आणि त्यात जर हे शब्द नसतील तर ही काळजी करायला लावणारी बाब आहे. कारण जर घटना दुरुस्ती झाली आहे तर त्याच्याच प्रती दिल्या गेल्या पाहिजेत. यातून सरकारचा हेतू संशयास्पद असल्याचं स्पष्ट होतं आहे..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे