आपला जिल्हा

सोलापूर-आज लोटेवाडी येथील सुकन्या “कु.संध्याराणी कैलास सावंत यांची ,कृषी उपसंचालिका-क्लास-१-अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल चोपडी येथे भव्य सत्कार” ..

सोलापूर:२१ सप्टें.bhimrajnews.com

सांगोला तालुक्यातील लोटेवाडी गावची कन्या कुमारी संध्याराणी कैलास सावंत हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2022 मध्ये
सुयश प्राप्त केले असून तिचे तालुका आणि परिसरातुन कौतुक होत आहे.

याचाच एक भाग म्हणून नालंदा वसाहत बौद्ध विहार चोपडी येथे, चोपडी ग्रामस्थांच्या वतीने आज गुरुवार दिनांक 21/ 1 /2023 रोजी सायंकाळी 6 वाजता ,त्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमावेळी, प्रमुख उपस्थिती म्हणून सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक किशोर बनसोडे, बहुजनांची नेते बापूसाहेब ठोकळे, युवक नेते अँड अक्षय दादा बनसोडे, युवक नेते नितीन भाऊ रणदिवे, डॉ चंद्रकांत धांडोरे  इत्यादी अन हितचिंतक आप्तेष्ट नातेवाईक- ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.

तरी या आपल्या नूतन यशस्वी क्लास वन अधिकारी सावंत परिवाराचे कौतुक अन सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे