आपला जिल्हा

राष्ट्रवादी (शरद पवार)काँग्रेसच्या “सांगोला तालुकाध्यक्षपदी गायगव्हाण गावचे लोकप्रिय  उद्योजक नवनाथ पाटील यांची निवड”..

सोलापूर -२४ bhimrajnews.com

नुकताच सांगोला तालुक्यातील गायगव्हाण गावचे तडफदार-लोकप्रिय उद्योजक नवनाथ पाटील यांची शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी नियुक्ती राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे.

सदर नियुक्तीनंतर, सांगोला तालुक्यातुन त्यांच्या या योग्य निवडीबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या निवडीनंतर नवनाथ पाटील यांनी सांगोला तालुक्यात लवकरच गावोगावी दौरा करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा विचारविनिमय करून 10 ऑक्टोबर पर्यंत सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकारणीची निवड करणार आहे
राष्ट्रवादीचे खा शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे